नुकतेच ठाणे पालिका मुख्यालयात महापालिका, एमएमआरडीएड आणि इतर अधिकाऱ्यांची विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक झाली. यावेळी मंत्री सरनाईक यांनी मेट्रोबाबत माहिती दिली. वडाळा-घाटकोपर ते गायमुख असा मेट्रो-4 प्रकल्पाची ठाणेकरांना प्रतीक्षा आहे.
मेट्रो-4 हा मार्ग मुंबईहून तीन हात नाका मार्गे घोडबंदरला जोडण्यात आला आहे. पूर्वी ही मेट्रो मार्ग कासारवडवलीपर्यंत होता. मात्र त्यानंतर त्याचा विस्तार पुढे गायमुखपर्यंत करण्यात आला. ठाण्याहून साकेत खाडीमार्गे थेट गायमुखहून फाउंटनमार्गे हा किनारी मार्ग असेल.
advertisement
काही दिवसांपूर्वीच ट्रायल रन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वीच मेट्रोची ट्रायल रन घेण्यात आली होती. आता डिसेंबरमध्येच या मेट्रो मार्गाचे लोकार्पण होणार असल्याची घोषणा मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. त्यामुळे याच महिन्यात सर्वसामान्य ठाणेकरांचे मेट्रोने प्रवास करण्याचे स्वप्न साकार होणार आहे.






