TRENDING:

'चॉकलेट खिलाया...' मुंब्य्रात जाऊन जितेंद्र आव्हाडांनी केली सहर शेखची नक्कल, तिकीट का दिलं नाही? भाषणाचा VIDEO

Last Updated:

"तुमचं नाराज असणं मी समजू शकतो. तिकीटावर तुमचा हक्का होता. स्टेशनवर असं झालं, अनेक भागामध्ये झालं, रशिद कम्पाऊंडमध्ये झालं आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंब्रा : "चॉकलेट खिलिया.. असं बोलून कधी टीव्हीवर गेलो नाही. लहान मुलांना नेहमी प्रेमाने पाहा. कुणाबद्दल अहंकार नकोय. जर कुठली पोरगी बोलली असेल तर आपलीच मुलगी आहे. तिला प्रेमाने सांगा, तिच्याकडे तसंच पाहा. आपल्याला काही फरक पडत नाही. कारण आम्हाला माहितीये,  तिकीट घेण्यासाठी ४० जण समोर होते. आता कुणा कुणाला तिकीट द्यायचं. आता भाकरी सारखं काय कापून घेणार होता का? नाही देऊ शकलो तर नाही देऊ शकलो' असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्य्रातील सहर शेख हिच्या वादावर पहिल्यांदाच भाष्य केलं.
News18
News18
advertisement

ठाणे महापालिका निवडणुकीत तिकीट न दिल्यामुळे एमआयएमची नगरसेविका सहर शेख हिने 'कैसा हरया' म्हणत जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली होती. या वादानंतर  राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज मंगळवारी मुब्र्यांत जोरदार शक्ती प्रदर्शन करत विजय रॅली काढत जल्लोष साजरा केला.  यावेळी झालेल्याा सभेत तिकीट का दिलं नाही, याबद्दल आव्हाडांनी खुलासा केला.

advertisement

" मुंब्रातून नवीन लिडर जन्माला आली, ती आधीच झाली होती, मर्जीया. जी आपल्या विचारामुळे लोकांना ओळखते. चॉकलेट खिलाया असं म्हणून कधी टीव्हीवर गेली नाही.लहान मुलांना नेहमी प्रेमाने पाहा. माफ करा,  कुणाबद्दल अहंकार नकोय. जर कुठली पोरगी बोलली असेल तर आपलीच मुलगी आहे. तिला प्रेमाने सांगा, तिच्याकडे तसंच पाहा. आपल्याला काही फरक पडत नाही. कारण आम्हाला माहितीये,  तिकीट घेण्यासाठी ४० जण समोर होते. आता कुणा कुणाला तिकीट द्यायचं. ती काय भाकरी होती का,  एका घरात कापून घेणार आहात का? नाही देऊ शकलो तर नाही देऊ शकलो' असं आव्हाड म्हणाले.

advertisement

"तुमचं नाराज असणं मी समजू शकतो. तिकीटावर तुमचा हक्का होता. स्टेशनवर असं झालं, अनेक भागामध्ये झालं, रशिद कम्पाऊंडमध्ये झालं आहे. रशीद भाई ही लढाई प्रेमाने जिंकायची असते. त्यामुळे या शहराला मी प्रेमाने जिंकलं होतं. माझ्या डोळ्यात नेहमी प्रेम दिसेल. या शहराने जितेंद्रने बनवलं आहे. उद्या या शहराला काही देणं राहिलं तर ते प्रेमानेच देईन. या शहरात २००९ मध्ये मी आलो तेव्हा या शहराने मला न ओळखता बरंच काही दिलं. माझ्या शरिराच्या चाामडी काढून चप्पल जरी बनवली तरी या शहराने जे दिलं ते भरून निघणार नाही' असं म्हणत आव्हाड भावुक झाले.

advertisement

'गेल्या ८ -१० दिवस मुब्य्राची खुप चर्चा सुरू आहे. मला स्वतंत्र मिळाल्यानतंर एक गाणं आठवत 'हम लाये है तुफान से कष्ती निकाल के इस मुंब्रा को बचा कर रखे' मुंब्रा शहर नेहमी बदनाम राहिलं आहे. कधी  RDX ने तर कधी हत्या प्रकरणामुळे मुंब्रा बदनाम राहिलं आहे.  मला धमकी देण्याच्या घरचा दरवाजा वाजवला तर त्याचे वडील मला जेवायला देतील. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. मी घाबरत असतो तर RSS वर बोललो नसतो. लहानपणापासून मारामारी सगळं पहिले आहे.  मला धमकी देण्याच्या घरचा दरवाजा वाजवला तर त्याचे वडील मला जेवायला देतील. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही.  मी घाबरत असतो तर RSS वर बोललो नसतो. कुणी सागितलं मुंब्र्यात येऊन दाखवं, असं सागितलं म्हणून मुंब्र्यात आलो नाही, मला वाघांनी सांगितलं तरी मी जंगलात ही जाईन' असंही आव्हाड म्हणाले.

advertisement

 'कोणाला शत्रू समजत नाही'

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर पुन्हा वाढले, मका आणि कांद्याची काय स्थिती? इथं चेक करा
सर्व पहा

"माझ्यावर या शहरांनी प्रेम केलं आहे. मी चालत गेलो तरी मोर्चा निघतो. मी शांत आहे, शांत राहू द्या अन्यथा काही लोकांची झोप उडेल. माझं तोंड उघडू देऊ नका नाहीतर काही लोक जेलमध्ये जातील.  मी काम केलं म्हणून निवडून मोठ्या मताने आलो. काही माझे मित्र हरले मात्र त्यांची लढाई आता सुरू झाले आहे. मी कुणाला शत्रू समजत नाही म्हणून मी कोणाला उत्तर देणार नाही. त्यांची औकात ही नाही.  या शहराची ओळख ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहे, या शहराची ओळख ही महाराष्ट्राच्या संस्काराची ओळख आहे, हे शहर जात -धर्म-भाषा याच्या पलीकडचा जाऊन विचार करत म्हणून हे शहर एक आहे" असं म्हणत आव्हाड यांनी भाषण आटोपत घेतलं.

मराठी बातम्या/ठाणे/
'चॉकलेट खिलाया...' मुंब्य्रात जाऊन जितेंद्र आव्हाडांनी केली सहर शेखची नक्कल, तिकीट का दिलं नाही? भाषणाचा VIDEO
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल