मध्य रेल्वेची मोठी घोषणा
या सगळ्यातील एक मोठा आणि महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे कल्याण ते बदलापूरदरम्यान तिसरी आणि चौथी मार्गिका उभारण्याचे काम. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे आणि लोकलमधील गर्दी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. या प्रकल्पाबाबत आता नवीन माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण-बदलापूर तिसरी-चौथी मार्गिका प्रकल्पाचे 30 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम युद्धपातळीवर सुरू असून हा प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा मार्ग तयार झाल्यानंतर प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे.
advertisement
मध्य रेल्वेचं नवीन स्टेशन लवकरच उभं राहणार
हा प्रकल्प एमआरव्हीसी मार्फत एमयूटीपी-3ए अंतर्गत राबवला जात आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक क्षमता वाढेल आणि लोकलची अतिरिक्त फेऱ्या चालवणे शक्य होणार आहे. संपूर्ण प्रकल्पासाठी 1,510 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या कामात विठ्ठलवाडी, उल्हासनगर आणि अंबरनाथ येथे प्लॅटफॉर्म विस्तारीकरण पूर्ण झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे याच प्रकल्पांतर्गत एक नवीन रेल्वे स्थानक उभारले जात आहे.
नवे स्थानक कुठे उभे राहणार?
अंबरनाथ आणि बदलापूर यांच्या दरम्यान चिखलोली नावाचे नवीन स्थानक उभारले जात आहे. सध्या स्टेशन इमारतीच्या पहिल्या मजल्याचा स्लॅब पूर्ण झाला असून पुढील काम जलदगतीने सुरू आहे. लवकरच हे स्थानक सर्वसामान्यांसाठी सुरु होणार आहे. या नव्या स्टेशनमुळे अंबरनाथ आणि बदलापूरवरील प्रवासी भार कमी होईल.
