मुरबाड परिसरातील पूल अचानक कोसळला
या पुलावरून दररोज मुरबाड आणि कल्याण परिसरात नोकरी, शिक्षण, भाजीपाला आणि दूध विक्रीसाठी जाणारे शेकडो प्रवासी प्रवास करत होते. पूल कोसळल्यानंतर या गावांचा मुख्य संपर्क मार्ग तुटला असून नागरिकांना आता अनेक किलोमीटरचा वळसा घालावा लागत आहे. त्यामुळे वेळ, पैसा आणि मेहनत अधिक खर्ची पडत आहे.
advertisement
स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यांनुसार पावसाळ्यात हा पूल वारंवार पाण्याखाली जात होता. पुलाची दुरवस्था लक्षात घेऊन गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दुरुस्ती शिवाय नव्या पुलाची मागणी करण्यात येत होती. मात्र या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले. विशेष म्हणजे मुरबाड तालुक्यातील प्रसिद्ध म्हशाची जत्रा काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच पूल कोसळल्याने यात्रेकरूंसह व्यापाऱ्यांचीही अडचण वाढली आहे. प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
