या संदर्भात आज उल्हासनगर वाहतूक शाखेसोबत बैठक होणार आहे. कल्याण- मुरबाड रोडवर म्हारळ, वरप आणि कांबा या ठिकाणी अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. या शाळांच्या स्कूल बसना पर्यायी मार्ग हा लांब पल्ल्याचा ठरणार आहे. त्यांनाही शहाड पुलाखालून मुरबाडच्या दिशेने मार्गस्थ होण्याची परवानगी हवी आहे. आजच्या बैठकीस स्कूल बस चालक मालकही सहभागी होणार आहेत. वाहतूक पोलिसांनी या काळात सर्व मार्गांवर दिशा दर्शक फलक, मार्गदर्शन बोर्ड आणि रिफ्लेक्टरसह सूचना चिन्हे बसविण्याची तयारी केली आहे.
advertisement
Marathwada Weather : पुढील 24 तास धोक्याचे, मराठवाड्यात जोरदार कोसळणार पाऊस, 3 जिल्ह्यांना अलर्ट
3 ते 23 नोव्हेंबर दरम्यान वाहनचालकांना थोडा संयम ठेवावा लागणार असला, तरी या कामानंतर शहाड पुलावरून प्रवास अधिक सुखद होईल. ठाणे वाहतूक विभाग व महामार्ग प्राधिकरणाने नागरिकांना दिलेल्या सूचनांचे पालन करून सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी कल्याण एसटी डेपोचे व्यवस्थापक महेश भोये यांनी सांगितले की, कल्याण एसटी डेपोतून कल्याण अहिल्यानगरकडे जाण्यासाठी दर 15 मिनिटांनी एक बस सोडली जाते. त्याचबरोबर मुरबाडसाठी बस चालविल्या जातात. याशिवाय मुरबाड बस डेपोतूनही कल्याणच्या दिशेने बस चालविल्या जातात. पूल बंद असल्याने पर्यायी मार्ग हा 12 किलोमीटरने प्रवासाचे अंतर वाढणार असून प्रवाशांना जास्तीचे तिकीट घेण्याची शक्यता असल्याने अनेक अडचणी या काळात येऊ शकतात.
वाहतूक बंदी आणि पर्यायी मार्गांचे तपशील1) माळशेजकडून कल्याणकडे येणारी वाहने
प्रवेश बंद ठिकाण - डॅम फाटा, मुरबाड (ठाणे ग्रामीण हद्द)
पर्यायी मार्ग - डॅम फाटा - बदलापूर रोड - पालेगाव - नेवाळी नाका - मलंग रोड - लोढा पलावा / शिळ-डायघर रोड / पत्रीपूल - कल्याण
2) जड वाहनांसाठी विशेष मर्यादा
या पर्यायी मार्गांवर जड व अवजड वाहनांना सकाळी 06.00 ते 11.00 आणि सायंकाळी 17.00 ते 22.00
या वेळेत प्रवेश बंद राहील. या वेळेत केवळ लहान वाहनांना परवानगी असेल.
3) माळशेजहून कल्याणकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या ठाणे ग्रामीण हद्दीत दहागाव फाटा मुरबाड येथे प्रवेश बंद केला आहे. ही वाहने बदलापूर रोडने बदलापूर, पालेगाव, नेवाळी नाका, मलंग रोड, लोढा पलावा शीळ डायघर रोड पत्रीपूलमार्गे कल्याणमध्ये येतील. मुरबाडहून शहाड पुलावरून कल्याणकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना दहागाव फाटा येथे प्रवेश बंद केला आहे. ही वाहने दहागाव फाटामार्गे वाहोली, एरंजाड, बदलापूर पालेगाव, नेवाळी नाका, मलंग रोड, लोढा पलावा शीळ डायघर रोड पत्रीपूल मार्गे कल्याण शहरात येतील. कल्याणकडून मुरबाडकडे जाणारी वाहतूक ही सर्व प्रकारच्या वाहनांना दुर्गाडी येथे प्रवेश बंद केला आहे. ती पत्रीपूल, चक्कीनाका, नेवाळी नाका, बदलापूरमार्गे इच्छितस्थळी जातील.






