क्षणात संसार उद्ध्वस्त
चंदनसार शिरगाव परिसरातील साईराम इमारतीत कृष्णा पवार (वय 40) आणि त्याची पत्नी सपना पवार (वय 35) हे दाम्पत्य वास्तव्यास होते. मागील काही दिवसांपासून घरगुती कारणांवरून दोघांमध्ये सतत वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी रात्री कृष्णा पवार मद्यधुंद अवस्थेत घरी परतला आणि त्यानंतर पत्नी सपनासोबत पुन्हा किरकोळ कारणावरून त्यांचा जोरदार वाद झाला.
advertisement
वाद इतका वाढला की संतप्त कृष्णा पवारने सपनाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत तिचे डोके जोरात फरशीवर आपटले. गंभीर दुखापत झाल्याने सपना रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि जागीच तिचा मृत्यू झाला.
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच विरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी कृष्णा पवारला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात कौटुंबिक वाद आणि मद्यपान हे हत्येचे मुख्य कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे.
