नालासोपाऱ्यात किरकोळ वादातून रक्ताचा सडा
मिळालेल्या माहितीनुसार, 29 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास तक्रारदार आरोपी मदन मांगला याच्या घरी गेले होते. काही दिवसांपूर्वी फिर्यादीने आरोपीला पाच हजार रुपये उसने दिले होते. हे पैसे परत मिळावेत यासाठी तक्रारदार आरोपीकडे गेले असता दोघांमध्ये वाद झाला.
पैसे मागितल्याचा राग मनात धरून आरोपी मदन याने तक्रारदारासर शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढताच आरोपीने घरातून चाकू आणला आणि थेट तक्रारदाराच्या पोटाच्या डाव्या बाजूस वार केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
advertisement
परिसरात उडाली खळबळ
या हल्ल्यात तक्रारदार गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अर्नाळा सागरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. परिसरात वाढत असलेल्या अशा गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
