TRENDING:

Thane News : वडिलांच्या ओरडण्यामुळे मुलगा घराबाहेर पडला; नंतर जे घडलं त्याने सर्वांचा उडाला थरकाप

Last Updated:

Thane News : ठाण्यातील एका धक्कादायक घटनेत वडिलांनी मुलाला मोबाईलवरुन ओरडल्यावर त्याने घर सोडले. त्यानंतर काय घडलं पोलिसांनी तपासात काय समजलं की नाही ते एकदा सविस्तर पाहा.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे : गेल्या काही वर्षांपासून मोबाईलचा वापर प्रत्येक वयोगटात वाढलेला आहे. पण लहान मुलांवर याचा विपरीत परिणाम होत आहे.त्यांच्याकडून मोबाईल काढून घेतला तरी त्यांना राग येतो किंवा चिडचिड हे प्रकार होतात. शिवाय बऱ्याच प्रकरणांमध्ये याआधी मुलांकडून मोबाईल काढून घेतल्याने अनेक धक्कादायक घटना घडलेल्या आहेत.अशातच ठाण्यातील एका प्रकरणात मुलाने मोबाईलवरुन वडिलांवर ओरडल्यावर घाबरून घर सोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
News18
News18
advertisement

नेमकं त्या दिवशी काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे शहराच्या इंदिरानगर भागातील ही घटना आहे. जिथे लसूण विक्रीचा व्यवसाय करणारा विक्रेता कुटुंबिसोबत वास्तव्यास आहे. या विक्रेताचा मुलगा नववीपर्यंत शिकला मात्र त्यानंतर तो शाळेत जाण्याऐवजी घरीच राहून वारंवार मोबाईवर असायचा.

21 नोव्हेंबर रोजीही तो मोबाईल पाहण्यात दंग होता, त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला 'मोबाईल पाहू नकोस,अभ्यासाकडे लक्ष दे' असे सांगितले. त्याचा राग मुलाला एवढा आला की तो लगेच घरातून निघून गेला. घरातून रागाच्या भरात निघून गेलेला मुलगा परत आला नसल्याने वडिलांच्या मनात भिती वाढली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली, उच्चशिक्षित बहिणींनी सुरू केला व्यवसाय, महिन्याला लाखांची कमाई
सर्व पहा

वडिलांनी मुलाला परिसरात शोधले तसेच त्यांच्या मित्रांजवळही पाहिले पण तो कोणाकडेही गेला नसल्याचे समजले. मग काय वडिलांनी तात्काळ श्रीनगर पोलिस ठाण्यात धाव घेत अपहरणाची तक्रार नोंदवली आहे.

मराठी बातम्या/ठाणे/
Thane News : वडिलांच्या ओरडण्यामुळे मुलगा घराबाहेर पडला; नंतर जे घडलं त्याने सर्वांचा उडाला थरकाप
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल