ठाणेकरांना मिळणार आरामदायी प्रवासाचा अनुभव
पहिल्या टप्प्यात एकूण 25 बस येणार असून त्यातील चार ते पाच बस येत्या दहा दिवसांत ठाणे परिवहन सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. उर्वरित बस पुढील काही महिन्यांत टप्प्याटप्प्याने ताफ्यात समाविष्ट करण्यात येणार आहेत.
या बस खरेदी प्रक्रियेअंतर्गत काही दिवसांपूर्वी ठाणे परिवहन सेवेच्या अधिकाऱ्यांचे पथक दिल्ली येथे गेले होते. तेथे त्यांनी बसच्या तांत्रिक बाबी, सुरक्षितता, चार्जिंग व्यवस्था आणि इतर सुविधांची सविस्तर पाहणी केली. सुरुवातीला काही तांत्रिक अडचणी आढळून आल्या होत्या. मात्र त्या अडचणी दूर करण्यात आल्या असून आता प्रत्यक्ष बस दाखल होण्यास कोणताही अडथळा राहिलेला नाही.
advertisement
या पंतप्रधान इलेक्ट्रिक बस योजनेअंतर्गत राज्यातील विविध महानगरपालिका आणि नगरपालिकांना या बस दिल्या जाणार आहेत. यामध्ये नागपूर पालिकेला प्रथम प्राधान्य देण्यात आले होते त्यानंतर ठाणे पालिकेचा क्रमांक होता. मात्र तांत्रिक कारणांमुळे नागपूरमध्येही या बस दाखल होण्यास उशीर झाला. आता ठाणेकरांना लवकरच पर्यावरणपूरक, शांत आणि आधुनिक इलेक्ट्रिक बस सेवेचा लाभ मिळणार आहे
