आधीच घोडबंदर येथील वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठाणे महापालिकेने येथील गायमुख घाट परिसरात रस्त्याच्या दुरुस्तीसाठी काही दिवसांपूर्वीच ठाणे वाहतूक नियंत्रण शाखेकडे परवानगी मागितली आहे. येथील गायमुख घाट रस्त्याचे सुमारे 500 मीटर लांबीचे काम केले जाणार आहे. या कालावधीत वाहनांचा भार वाढून कोंडीची भीती व्यक्त केली जात आहे.
advertisement
Mega Block : मध्य रेल्वेचा ब्लॉक; गाड्यांच्या वेळापत्रकात मोठा बदल; कधी अन् कुठे?वाचा
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठाणे महापालिकेने येथील गायमुख
घाट परिसरात रस्ते दुरुस्तीसाठी काही दिवसांपूर्वी ठाणे वाहतूक नियंत्रण शाखेकडे परवानगी मागितली. ठाणे वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार 12 डिसेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजून 1 मिनिटाने दुरुस्ती कामाला सुरुवात केली जाईल.
तात्पुरते नियम गायमुखघाट रस्ता दुरुस्ती
गायमुख घाटाच्या दुरुस्तीसाठी अवजड वाहने 12 ते 14 डिसेंबर या काळात भिवंडी-वाडा, मुंबई-नाशिक मार्गावर वळवण्यात आली होती, तर हलकी वाहने घाटातून एकेरी मार्गाने सोडली जात होती.
पर्यायी मार्ग:
मुंबई-नाशिक कडे जाणारी वाहने अंजूरफाटा येथून मानकोली मार्गे मुंबई-नाशिक महामार्गावर जातील. वाडा/गुजरात कडे जाणारी वाहने वडपे, चाविंद्रा, वंजारपट्टी उड्डाणपूल मार्गे जातील.
रांजनोळी नाक्यावरून: रांजनोळी नाक्यावरून वाहने मुंबई-नाशिक बायपासवर मानकोली नाका, अंजूरफाटा किंवा वसईकडे वळतात.
नाशिक येथून घोडबंदरच्या दिशेने येणाऱ्या अवजड वाहनांना मानकोली येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने मानकोली पुलाखालून अंजुर फाटा मार्गे जातील. हलकी वाहने घोडबंदर घाटातून रस्ते कामाच्या ठिकाणावरून विरुद्ध दिशेने वाहतूक करतील.
12 ते 14 डिसेंबर (तीन दिवस कामाचे)
ठाणे वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी अधिसूचना जाहीर केली असून अधिसूचनेनुसार 12 डिसेंबरला मध्यरात्री 12.01 वाजता दुरुस्ती कामाला सुरुवात होणार आहे. तर 14 डिसेंबरला रात्री 11.59 मिनिटांपर्यंत या कामासाठी परवानगी देण्यात आली आहे.






