ड्युटीवरच काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार दिलीप कुमार साहू दुपारी सुमारे 2.30 वाजता विरार येथे आपल्या नियमित सेवेसाठी रुजू झाले होते. प्लॅटफॉर्म क्रमांक 4एच्या दिशेने जाणाऱ्या ईएमयू रेकचे शंटिंग काम ते करत होते. रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास शंटिंग प्रक्रियेदरम्यान ते रुळ ओलांडत असताना डाउन लाईनवरून वेगात येणाऱ्या ट्रेनने त्यांना जोरदार धडक दिली.
advertisement
या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 22, 2025 7:43 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Virar News : चटका लावणारा अंत; विरारमध्ये ड्युटी करताना मोटरमनचा अपघाती मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर
