राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज मंगळवारी मुब्र्यांत जोरदार शक्ती प्रदर्शन करत विजय रॅली काढत जल्लोष साजरा केला. ठिकठिकाणी आव्हाड यांचं जंगी स्वागत झालं. यावेळी झालेल्या सहर शेख आणि तिच्या वडिलांना तिकीट का दिलं नाही, याबद्दल आव्हाडांनी जाहीर खुलासा केला.
advertisement
"तिकीट घेण्यासाठी ४० जण समोर होते. आता कुणा कुणाला तिकीट द्यायचं. आता ती काय भाकरी होती का, एका घरात ४ तुकडे करून खाणार होता? नाही देऊ शकलो तर नाही देऊ शकलो. तिकीट न मिळाल्यामुळे तुमचं नाराज असणं मी समजू शकतो. तिकीटावर तुमचा हक्का होता. स्टेशन परिसरात असं झालं, अनेक भागामध्ये झालं, रशिद कम्पाऊंडमध्ये झालं आहे. रशीद भाई ही लढाई प्रेमाने जिंकायची असते. त्यामुळे या शहराला मी प्रेमाने जिंकलं होतं, असं म्हणत आव्हाड यांनी पहिल्यांदाच तिकीट वाटपाच्या मुद्यावर भाष्य केलं.
'माझं तोंड उघडू नका'
"माझ्यावर या शहरांनी प्रेम केलं आहे. मी चालत गेलो तरी मोर्चा निघतो. मी शांत आहे, शांत राहू द्या अन्यथा काही लोकांची झोप उडेल. माझं तोंड उघडू देऊ नका नाहीतर काही लोक जेलमध्ये जातील. मी काम केलं म्हणून निवडून मोठ्या मताने आलो. काही माझे मित्र हरले मात्र त्यांची लढाई आता सुरू झाले आहे' असंही यावेळी आव्हाड म्हणाले.
