के.के. रेंज या लष्कराच्या रणगाडा सराव प्रशिक्षण केंद्रासाठी नगर, राहुरी आणि पारनेर तालुक्यातील 23 गावांमधील तब्बल 42 हजार एकर जागा संपादित करण्याचा प्रस्ताव संरक्षण खात्यानं सादर केलाय. त्यात शासकीय आणि खासगी जगांचाही समावेश आहे. या आधीही लष्कराकडून असा प्रस्ताव करण्यात आला होता. मात्र विरोधानंतर तो स्थगित करण्यात आला होता. पण आता प्रशासकीय स्तरावर पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थ धास्तावले आहेत.