छत्रपती संभाजीनगर : दररोज सकाळी नाश्त्यासाठी काय करावे हा आपल्याला सर्वात मोठा प्रश्न असतो. आपण एकतर पोहे करतो किंवा उपमा करतो. पण नेहमी पोहे आणि उपमा खाऊन कंटाळा येतो. यामुळे पोहे आणि उपमा पेक्षा तुम्ही रवा हांडवो हा एक पदार्थ सकाळच्या नाश्त्यासाठी करू शकता. रवा हांडवो ही एक गुजराती डिश आहे. तर या रवा हांडवोची रेसिपी आपल्याला छत्रपती संभाजीनगरमधील गृहीणी मेघना देशपांडे यांनी सांगितली आहे