राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महापुराची परिस्थिती निर्माण झाली आहे.यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात उभी पिकं पाण्याखाली गेली आहेत. मका, कपाशी आणि सोयाबीनसह अनेक हंगामी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.हातातोंडाशी आलेला घास पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने शेतकऱ्यांची स्वप्नं चक्क पाण्यात बुडाली आहेत.कर्ज काढून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आता कर्जाचा बोजा अधिकच वाढला आहे.यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून प्रशासनाकडून तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी होत आहे.