'तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती...', नवरात्रीनिमित्त मराठी अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोशूटवर का चर्चा रंगली?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
सध्या सर्वत्र नवरात्रीचा उत्साह आहे. अनेक अभिनेत्री नवरात्रीच्या नऊ रंगांनुसार फोटोशूट करून सोशल मीडियावर शेअर करत आहेत.
advertisement
1/9

मुंबई: सध्या सर्वत्र नवरात्रीचा उत्साह आहे. अनेक अभिनेत्री नवरात्रीच्या नऊ रंगांनुसार फोटोशूट करून सोशल मीडियावर शेअर करत आहेत. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अक्षया नाईकही सध्या चर्चेत आहे.
advertisement
2/9
तिने निळ्या रंगाच्या साडीत एक खास फोटोशूट केलं आहे. पण, या फोटोशूटची चर्चा फक्त तिच्या सौंदर्यामुळे नाही, तर त्यामागे असलेल्या खास संदेशामुळे होत आहे.
advertisement
3/9
अक्षया नाईकने दिग्दर्शक रवी जाधव यांच्या ‘न्यूड’ या चित्रपटातील ‘यमुना’ या पात्रापासून प्रेरणा घेऊन हे फोटोशूट केलं आहे.
advertisement
4/9
‘न्यूड’ चित्रपटात एका आईचा संघर्ष दाखवला आहे, जी तिच्या मुलाच्या शिक्षणासाठी एका कला महाविद्यालयात विद्यार्थ्यांसमोर ‘न्यूड मॉडेल’ म्हणून काम करते.
advertisement
5/9
या फोटोसोबत अक्षयाने एक लांब पोस्टही शेअर केली आहे, ज्यात तिने ‘यमुना’च्या भूमिकेचं महत्त्व सांगितलं आहे.
advertisement
6/9
ती म्हणाली की, “यमुनाचा प्रवास फक्त चित्रासाठी पोझ देण्याबद्दल नाही, तर तिच्या शरीरावर, तिच्या निवडीवर आणि तिच्या प्रतिष्ठेवर पुन्हा अधिकार मिळवण्याबद्दल आहे.”
advertisement
7/9
अक्षया पुढे म्हणाली, “एका छोट्या गावातील महिला जेव्हा अशा ठिकाणी जाते, जिथे तिच्या शरीराला फक्त एक कला म्हणून पाहिलं जातं, तेव्हा ती स्वतःच एक कला बनते. ती तिच्यावर लावलेल्या कलंकाशी लढते आणि स्वतःमध्ये एक ताकद शोधते.”
advertisement
8/9
[caption id="attachment_1488381" align="alignnone" width="750"] अक्षयाने ‘न्यूड’ सिनेमातील अभिनेत्री कल्याणी मुळे आणि छाया कदम यांचंही अभिनंदन केलं. ती म्हणाली, “तुमच्या अभिनयाने अनेक कलाकार आणि महिलांना प्रेरणा दिली आहे.”</dd> <dd>[/caption]
advertisement
9/9
हे फोटोशूट पाहून नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला चांगलेच सुनावले आहे. एका यूजरने थेट 'तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती तेपण नवरात्रीमध्ये'असे म्हटले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती...', नवरात्रीनिमित्त मराठी अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोशूटवर का चर्चा रंगली?