संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी दोन प्रमुख आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पुण्यातून दोन आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते आहे. हत्या प्रकरणातील फरार असलेल्या सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे यांच्यातील दोन जण असण्याची शक्यता आहे. थोड्याच वेळात पोलीस अधीक्षक कार्यालयात अधिकृतरित्या माहिती देण्यात येणार आहे.