
BNollywood Romantic Song : 'दबंग 3' चित्रपटातील हे 'आवारा' गाणं आहे. हे गाणं खूप भावनिक आहे. या चित्रपटात चुलबुल पांडे हा पोलिस अधिकारी आहे. जो एका मुलीच्या प्रेमात असतो. पण एक बाली सिंग नावाचा गुंड तिला ठार मारतो. पण हे तो पोलिस अधिकारी व्हायच्या अगोदरची घटना असते. जेव्हा त्याला हे भूतकाळातील प्रकरण समजते. तेव्हा तो बदला घेण्यासाठी बाली सिंगचा नायनाट करण्यासाठी हिंसक वळण घेतो. शेवटी तो बदला पूर्ण करतो. हे गाणं सलमान अलीने गायलं आहे. तर गाण्याचे संगीत हे साजिद-वाजिद यांनी दिले आहे. गाण्याचे बोल हे समीर अंजान याने लिहिले आहेत. चित्रपटात सलमान खान, सोनाक्षी सिन्हा, किच्चा सुदीप, सई मांजरेकर यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत.
Last Updated: Dec 16, 2025, 21:07 ISTनवी मुंबईमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे.शिवराम पाटील यांच्या पुतण्याने पैसे वाटल्याचा आरोप भाजप कार्यकर्ते करत आहेत. हा व्हीडिओ मनसे नेत्यांनी व्हायरल केला आहे.
Last Updated: Jan 12, 2026, 19:01 ISTदेवेंद्र फडणवासांनी पुण्याच्या मुलाखतीमध्ये अजित दादांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, "निवडून येता येत नाही तेव्हा काहीही जाहिरनामे काढतो, घोषणा करतात. पुण्यात घोषणा करणार होतो.पुण्यातील महिलांना विमान प्रवास फ्री करणार होतो. अनाउन्स करायला आपल्या बापाचं काय जातंय.."
Last Updated: Jan 12, 2026, 18:14 ISTभाजपने नाशिकच्या मुकेश शहाणेंची भाजप मधुन हकालपट्टी केली आहे. त्यांना पक्षातून काढल्यावर ते म्हणाले, "माझं काय चुकलं. माझ्यावर कुठले गुन्हेही नाहीत. मी प्रत्येक आंदोलनात सहभागी झालो. मी एकनिष्ठेने राहिलो हिच माझी चुक का, निष्ठावंत कार्यकर्त्याचा बळी दिलाय तुम्ही. हेच मला फळ दिलात काय."
Last Updated: Jan 12, 2026, 17:56 ISTकालच शिवतीर्थावर ठाकरे बंधूंची सभा झाली. त्यात मराठी भाषेचा उल्लेख झालाच. पण आज तीन हात नाका येथे इंग्रजी बॅनर लावल्याने ठाकरे बंधू ट्रोल झाले आहेत. तेव्हा मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले,"एकच बॅनर इंग्रजीमध्ये लावला आहे. बाकीचे ९९ टक्के बॅनर हे माराठीतच लावले आहेत. तो एक बॅनर परिभाषिकांसाठी लावला आहे." त्यावरुन मनसे आणि ठाकरे गट विरोधकांकडून ट्रोल झाला आहे.
Last Updated: Jan 12, 2026, 17:38 ISTपत्रकारांशी बोलताना आरपीआयचे मंत्री रामदास आठवले म्हणाले, "मुंबई पालिकेत राज ठाकरेंना फायदा होणार नाही. कारण ६० टक्के लोकं परप्रांतिय आणि ४० टक्के मराठी वोटर आहेत. राज ठाकरेंचं पानीपत होणार आहे. त्यामुळे आम्ही बीजेपी, शिवसेना महायुती सोबत येऊन लढत आहोत. त्यामुळे पनवेल आणि मुंबई महानगरपालिका आम्ही जिंकणार आहोत."
Last Updated: Jan 12, 2026, 16:57 IST