
Bollywood Song : 'डुप्लिकेट' चित्रपट 1998 मध्ये आला होता. या चित्रपटात 'मेरे मेहबूब मेरे सनम..' गाणं होते. ते खूपच लोकप्रिय झाले होते. या चित्रपटात अभिनेता शाहरुख खान हा दुहेरी भूमिकेत दिसला होता. यात शाहरुखची बबलू भूमिका आहे. या बबलूचे मोठा शेफ व्हायचे स्वप्न असते. तर शाहरुखची दुसरी भूमिका आहे ती मनु दादाची, जो खूप क्रूर असतो. यात जूही चावला आणि सोनाली बेंद्रे यांनीही प्रमुख भूमिका केली आहे. हे सुप्रसिद्ध गाणं उदित नारायण आणि अल्का याग्निक यांनी गायले आहे. तर गाण्याला संगीत अन्नु मलिक यांनी दिले आहे. गाण्याचे बोल जावेद अख्तर यांनी लिहिले आहेत. हा चित्रपट महेश भट्ट यांनी दिग्दर्शित केला होता.