चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री असले तरी अजित पवारांनी जिल्ह्यातील प्रशासकीय बैठकांचा धडाका लावला आहे. त्यामुळेच पुणे जिल्ह्याचा कारभारी कोण? यावरून या दोन दादा नेत्यांमध्ये कोल्ड वॉर सुरु झाल्याचं बोललं जातंय. विशेष म्हणजे हे प्रकरण आता मुख्यमंत्री शिंदेंच्या दरबारी पोहोचलंय.