
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुका हा संत्रासाठी प्रसिद्ध आहे. वरूड तालुक्यातील संत्र्याची चव इतर कुठे मिळणे शक्य नाही, असं नेहमी म्हटलं जातं. पण, इतरही अनेक पदार्थ असे आहेत ज्यांची चव कुठेही मिळणार नाही. त्यातीलच एक म्हणजे पांढुर्णा चौक येथील त्रिमूर्ती हॉटेल जवळील श्री यशवंत साई पोहा पॉइंट. याठिकाणी मिळणारे पोहे अतिशय टेस्टी असल्याचं खवय्यांकडून सांगण्यात येते. सकाळी 7 वाजतापासून याठिकाणी पोहे खाण्यासाठी गर्दी बघायला मिळते