
मुंबई: अनेकांना वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खायला आवडतात. कमी किमतीत हेल्दी आणि टेस्टी पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल, तर कांदिवली पश्चिमेकडील चारकोप परिसरातील एक कॅफे सध्या खवय्यांचे लक्ष वेधून घेत आहे. अवघ्या 99 रुपयांपासून सुरू होणाऱ्या डिशेस आणि वेगळ्या फूड कॉम्बिनेशनमुळे या कॅफेची चर्चा वाढताना दिसत आहे.
Last Updated: Jan 15, 2026, 13:22 ISTअमरावती : थंडीच्या दिवसांत गरमागरम भजी खाण्याची मजा काही वेगळीच असते. बटाट्याच्या भजीसोबतच कच्च्या केळीची भजी देखील अनेकांना आवडते. आरोग्यदृष्ट्या फायदेशीर आणि चवीला अप्रतिम अशी ही भजी घरी सहज करता येतात. कच्ची केळी ही फायबर, पोटॅशियम आणि आवश्यक पोषक घटकांनी भरलेली असते. त्यामुळे पचन सुधारण्यास मदत होते. योग्य मसाल्यांच्या संगतीने तयार केलेली कच्च्या केळीची भजी कुरकुरीत लागतात. जाणून घ्या, रेसिपी.
Last Updated: Jan 15, 2026, 13:38 ISTअमरावती : अनेकांना शिळे अन्न खाण्याची सवय असते. विशेषतः महिलांवर शिळे अन्न खाण्याची वेळ जास्त येते. कारण अन्न वाया घालवणे योग्य नाही, म्हणून महिला ते खातात. पण, शिळे अन्न खाण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. अनेकवेळा अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे लागेल तेवढेच अन्न बनवून आपले आरोग्य राखणे कधीही चांगले. पाहुयात, शिळे अन्न खाण्याचे दुष्परिणाम कोणकोणते आहेत
Last Updated: Jan 14, 2026, 17:00 ISTछत्रपती संभाजीनगर : भारतीय संस्कृतीत सण-उत्सव केवळ आनंदासाठी साजरे केले जात नाहीत, तर त्यामागे धार्मिक, सामाजिक, ऋतूमानाशी संबंधित तसेच वैज्ञानिक कारणेही दडलेली असतात. प्रत्येक सणाची स्वतःची अशी एक ओळख असते. ठरलेले धार्मिक विधी, विशिष्ट पोशाख, पारंपरिक पदार्थ आणि लोकपरंपरा. नव्या वर्षाची सुरुवात होताच साजरा केला जाणारा मकर संक्रांत हा पहिला महत्त्वाचा सण मानला जातो. देशभरात विविध नावांनी आणि विविध पद्धतीने हा सण साजरा होत असला, तरी त्यामागील मूळ भावार्थ एकच आहे. निसर्गाचे आभार मानणे आणि नव्या पर्वाची सुरुवात करणे.
Last Updated: Jan 14, 2026, 15:50 ISTमुंबई : मकर संक्रांत आली की गुळपोळीची आठवण येतेच. तिळगूळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणत मकर संक्रांती साजरी केली जाते. संक्रांतीच्या सणात तिळाचे लाडू, वड्या यांच्यासोबतच अनेक घरांमध्ये खास गुळपोळी केली जाते. थंडीत उष्णता देणारी आणि गोडव्याने नात्यांत गोडवा वाढवणारी ही गुळपोळी कशी करायची याची रेसिपी पाहूयात.
Last Updated: Jan 14, 2026, 14:47 IST