
मुंबई: सध्या मधुमेह म्हणजे डायबेटीस हा आजार अगदी तिशीतल्या तरुण-तरुणींनाही होताना पाहायला मिळतो. स्थूलता, पोटाचा वाढलेला घेर, शरीरात वाढलेली चरबीची पातळी ही डायबेटीसची लक्षण असू शकतात. तर, जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळेही टाईप 2 मधुमेहाचा धोका संभवतो. तसेच ताणतणाव, खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि लठ्ठपणा या तिन्ही गोष्टी मधुमेहासाठी जबाबदार आहेत. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ज्यांचे वजन जास्त आहे त्यांनाही मधुमेहाचा धोका असतो. त्यामुळे प्रत्येकानं जीवनशैलीतील चुकांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. या संदर्भात मुंबईतील एंडोक्राइनोलॉजिस्ट, डायबेटोलॉजिस्ट तथा वैद्यकीय संशोधक डॉ. शशांक जोशी यांनी अधिक माहिती दिली आहे.
Last Updated: November 11, 2025, 15:52 ISTमुंबई : मुंबईमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला वेगवेगळे पदार्थ खायला मिळतात. भांडुप पूर्व परिसरात नुकतंच सुरू झालेलं टीपी मॅगी पॉइंट हे ठिकाण सध्या तरुणाईचं नवं आकर्षण बनलं आहे. प्रणाली पाटील आणि तन्मय मोरे यांनी उभारलेला हा छोटेखानी पण अत्यंत खास फूड पॉइंट त्यांच्या मेहनतीचा आणि घरगुती चवीच उत्तम ठिकाण आहे. या ठिकाणी फक्त चविष्ट मॅगीच नाही तर कोल्ड कॉफी आणि पास्ताही अप्रतिम मिळतो, तेही अगदी परवडणाऱ्या किमतीत. या ठिकाणचा मेन्यू अगदी फक्त 39 पासून सुरू होतो आणि 100 च्या आत संपतो, त्यामुळे विद्यार्थ्यांपासून ते ऑफिसमधील तरुणांपर्यंत सर्वांना हा पर्याय परवडतो.
Last Updated: November 11, 2025, 17:08 ISTवर्धा : आजकाल थायरॉईड ही झपाट्याने वाढणारी गंभीर समस्या आहे. हा आजार गळ्यात असलेल्या थायरॉईडच्या ग्रंथींच्या दुष्परिणामांमुळे होतो. दिवसेंदिवस या आजाराचे भारतामध्ये रुग्ण वाढत असताना दिसून येतात. साधारणतः भारतामध्ये सव्वाचार कोटींपेक्षा जास्त रुग्ण या समस्येने ग्रस्त आहेत. त्यातल्या त्यात महिलांमध्ये थायरॉईडचे प्रमाण सर्वात जास्त बघायला मिळते. गरोदरपणा किंवा प्रसूती नंतरही प्रमाण वाढलेले दिसून येते. त्यामुळे थायरॉईडचे लक्षणे काय? आणि त्यावर आयुर्वेदिक पद्धतीने कोणते उपचार केले जाऊ शकतात यासंदर्भातच वर्धा मधील आयुर्वेद डॉक्टर नितीन मेशकर यांनी माहिती दिली आहे
Last Updated: November 11, 2025, 16:45 ISTछत्रपती संभाजीनगर : कोणताही पदार्थाला मिठाशिवाय चव येत नाही. जेवणात मीठ नसेल तर तो पदार्थ खायला चांगला लागत नाही. कोणताही पदार्थ मिठाशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे आपण दररोजच्या जेवणामध्ये मीठ हे वापरत असतो. जेवण बनवताना पांढरा मिठाचा वापर हा मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे आपण कोणते मीठ खावे? कोणते मीठ किती प्रमाणात खावे? याबद्दलच छत्रपती संभाजीनगरमधील आहार तज्ज्ञ अलका कर्णिक यांनी माहिती दिली आहे.
Last Updated: November 11, 2025, 14:57 ISTजळगाव : आपली मातृभाषा मराठी जशी वळणा-वळणावर बदलते, तसं आपल्या राज्याच्या खाद्यसंस्कृतीतही वैविध्य आढळतं. वडापाव, भाकरी अन् ठेचा हे तर सर्वांच्याच आवडीचे पदार्थ. मात्र यासह महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे पदार्थ मोठ्या चवीनं खाल्ले जातात. खान्देशातील वरण बट्टी आणि वांग्याच्या भाजीचा बेत म्हणजे जणू तृप्तीचा ढेकर.
Last Updated: November 11, 2025, 14:42 IST