
मुंबई: थंडीच्या दिवसांत बाजारांमध्ये ताजे, आंबटगोड आवळे अगदी मोठ्या प्रमाणांत विकायला असतात. हिवाळ्याच्या दिवसांत मुळातच आवळा खाणे पौष्टिक आणि पाचक असते. ऐन कडाक्याच्या थंडीत प्रत्येक घरी आवळ्याचे वेगवेगळे चविष्ट पदार्थ तयार केले जातात. आवळ्याची चटणी, आवळा कँडी, आवळा सुपारी, आवळा ज्यूस असे अनेक झटपट होणारे पदार्थ तयार केले जातात. परंतु काही पदार्थ असे असतात की जे हिवाळ्यात एकदाच तयार करून वर्षभरासाठी स्टोअर केले जातात त्यापैकीच 'आवळ्याचा मोरावळा' हा एक खास पदार्थ. आज आपण आवळ्याचा मोरावळा म्हणजेच मुरंबा कसा बनवायचा साहित्य आणि कृती बघणार आहोत.