
नाशीकच्या प्रभाग क्रमांक १६ मधून निवडून आलेल्या पूजा नवले यांच्यावर गुन्हा नोंद झाला. निवडून आल्यानंतर पराभूत उमेदवाराच्या घरासमोर नवले यांच्या कार्यकर्त्यांकडून धिंगाणा घालण्यात आला. तसेच घरात घुसून अश्लील कृत्य आणि आग लावण्याचा प्रयत्न केला गेला. १५ ते २० संशयित आरोपींवर गुन्हा दाखल केला गेला.
Last Updated: Jan 18, 2026, 15:19 ISTबीजेपीचा नगरसेवक होऊ द्यायचा नाही हे जवळ जवळ सगळ्यांनी ठरवलंच आहे. स्वतःच्याच राज्यात नगरसेवक लपवून ठेवायची वेळ येत असेल तर या राज्याची कायदा व्यवस्था पुर्णपणे ढासळलेली आहे. एकनाथ शिंदे स्वतः भाई म्हणून समजणाऱ्या अमित शहाच्या माणसाला सतःचे नगरसेवक बंद करुन ठेवावे लागतात. ही सेना डूप्लिकेट अमित शहांची सेना आहे. म्हणजे शहांना त्यांचा म्हणजेच शिंदेंचा माणुस मुंबईवर बसवायचा आहे.
Last Updated: Jan 18, 2026, 16:40 ISTनवी मुंबईच्या कोपरखैरणेमध्ये एका परप्रांतीय व्यक्तीने राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे तेथील मनसे कार्यकर्त्यांनी मनसे स्टाइलने पोलीसांच्या समोरच त्याला मारहाण केली.
Last Updated: Jan 18, 2026, 16:10 ISTगोंदियातील खडक डोंगरगाव शिवारात वनविभागाने मोठी कारवाई केली आहे. बिबट्याला बेशुद्धीचं इंजेक्शन देवून दहशत माजवणाऱ्या बिबट्याला जेरबंद केले. ९ जानेवारीला या बिबट्याने एका चिमुकल्याला ठार केले होते. या चपळ बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाला बेशुद्धी बंदूकीचा वापर करावा लागला.
Last Updated: Jan 18, 2026, 15:43 ISTआंबेगावमध्ये एक विचित्र अपघात झाला. एक दुचाकी कारला जावून धडकली. नशीब बलवत्तर म्हणून दुचाकीवरचे दोघंही बचावले.
Last Updated: Jan 18, 2026, 15:30 IST