TRENDING:

मी महाराष्ट्राचा दादा, गल्लीतला दादा कोण ओळखा पाहू, अजितदादांनी नक्कल करत महेश लांडगेंना डिवचलं, VIDEO

पुण्याच्या एका सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महेश लांडगेंना डिवचत शेअर केली आणि त्यांच्या दाढीची नक्कल केली. ते म्हणाले," मी महाराष्ट्राचा दादा आहे गल्लीतला दादा नाही, गल्लीतला दादा कोण ओळखा पाहू.. डर जाऊ आसानीसे वो मै कश्ती नही मिटा सके तुम मेरे, ये बात तुम्हारे बस कि नही.."

Last Updated: Jan 12, 2026, 15:23 IST
Advertisement

'घोषणा करायला बापाचं काय जातंय...', फडणवीसांचा अजित दादांना टोला, VIDEO

देवेंद्र फडणवासांनी पुण्याच्या मुलाखतीमध्ये अजित दादांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, "निवडून येता येत नाही तेव्हा काहीही जाहिरनामे काढतो, घोषणा करतात. पुण्यात घोषणा करणार होतो.पुण्यातील महिलांना विमान प्रवास फ्री करणार होतो. अनाउन्स करायला आपल्या बापाचं काय जातंय.."

Last Updated: Jan 12, 2026, 18:14 IST

'काय चुक माझी' निष्ठावंत कार्यकर्ता भावुक झाला, भाजपमधून झाली हकालपट्टी , VIDEO

भाजपने नाशिकच्या मुकेश शहाणेंची भाजप मधुन हकालपट्टी केली आहे. त्यांना पक्षातून काढल्यावर ते म्हणाले, "माझं काय चुकलं. माझ्यावर कुठले गुन्हेही नाहीत. मी प्रत्येक आंदोलनात सहभागी झालो. मी एकनिष्ठेने राहिलो हिच माझी चुक का, निष्ठावंत कार्यकर्त्याचा बळी दिलाय तुम्ही. हेच मला फळ दिलात काय."

Last Updated: Jan 12, 2026, 17:56 IST
Advertisement

एकीकडे मराठीचा गजर, दुसरीकडे सेना-मनसेकडून ठाण्यात इंग्रजीत बॅनर, शिंदेसेना-भाजप तुटून पडली, VIDEO

कालच शिवतीर्थावर ठाकरे बंधूंची सभा झाली. त्यात मराठी भाषेचा उल्लेख झालाच. पण आज तीन हात नाका येथे इंग्रजी बॅनर लावल्याने ठाकरे बंधू ट्रोल झाले आहेत. तेव्हा मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले,"एकच बॅनर इंग्रजीमध्ये लावला आहे. बाकीचे ९९ टक्के बॅनर हे माराठीतच लावले आहेत. तो एक बॅनर परिभाषिकांसाठी लावला आहे." त्यावरुन मनसे आणि ठाकरे गट विरोधकांकडून ट्रोल झाला आहे.

Last Updated: Jan 12, 2026, 17:38 IST

ठाकरेंच्या युतीचं पानिपत होणार, नगरपालिका आम्हीच जिंकणार, आठवलेंकडून आधीच निकाल जाहिर, VIDEO

पत्रकारांशी बोलताना आरपीआयचे मंत्री रामदास आठवले म्हणाले, "मुंबई पालिकेत राज ठाकरेंना फायदा होणार नाही. कारण ६० टक्के लोकं परप्रांतिय आणि ४० टक्के मराठी वोटर आहेत. राज ठाकरेंचं पानीपत होणार आहे. त्यामुळे आम्ही बीजेपी, शिवसेना महायुती सोबत येऊन लढत आहोत. त्यामुळे पनवेल आणि मुंबई महानगरपालिका आम्ही जिंकणार आहोत."

Last Updated: Jan 12, 2026, 16:57 IST
Advertisement

शेतात फवारणीची वेळ चुकवताय? थेट उत्पादनावर बसेल फटका, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला

कृषी

बीड : शेतीत कीड आणि रोग नियंत्रणासाठी फवारणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. मात्र फवारणीची योग्य वेळ चुकल्यास शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागू शकते. कृषी तज्ज्ञांच्या मते, पिकांच्या वाढीच्या ठराविक अवस्थेत आणि अनुकूल हवामानात फवारणी करणे आवश्यक असते. वेळेवर उपाय न केल्यास किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो आणि त्याचा थेट फटका उत्पादनावर बसतो. याबद्दलच कृषी अभ्यासक महादेव बिक्कड यांनी माहिती दिली आहे

Last Updated: Jan 12, 2026, 16:45 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
मी महाराष्ट्राचा दादा, गल्लीतला दादा कोण ओळखा पाहू, अजितदादांनी नक्कल करत महेश लांडगेंना डिवचलं, VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल