
शिरूरमध्ये शाळकरी मुलांची फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे.पुणे जिल्ह्याच्या शिरुर शहरात काही शाळकरी मुलांमध्ये हा तुफान राडा झाला. शाळकरी मुलांचे दोन गट आपसात वाद घालताना आणि एकमेकांना मारताना दिसत आहे. या घटनेचा १५ सेकंदाचा एक व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शाळकरी विद्यार्थी एकमेकांना मारहाण करताना दिसत आहेत.
Last Updated: Jan 10, 2026, 18:42 ISTNagpur Election News : नगरसेवक म्हणून निवडून आल्यास प्रभागात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रुग्णालय, ई-लायब्ररी उभारणे तसेच तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं भाजप उमेदवारांनी सांगितलं आहे. प्रभाग क्रमांक 28 मधील भाजप उमेदवार पिंटू झलके आणि किरण दातीर यांनी सकाळपासून जोरदार प्रचार रॅली काढत मतदारांशी थेट संवाद साधला. विकसित भागांसोबतच काही स्लॅम भागांचा समावेश असलेला हा प्रभाग आहे. गेल्या कार्यकाळात या प्रभागातील चारही नगरसेवक भाजपचे होते, मात्र यंदा भाजपने दोन नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे.
Last Updated: Jan 10, 2026, 19:07 ISTAjit Pawar News : Special Report राजकारणाच्या आखाड्यातील गुरु-शिष्य निवडणुकीच्या रिंगणात आमनेसांमने आले आहेत. त्यावरून पिंपरी चिंचवड पालिका निवडणुकीत राजकीय कुस्ती रंगली आहे. एकमेकांना चितपट करण्यासाठी दोन्ही नेत्यांकडून डाव टाकले जात आहेत. त्यामुळे राजकीय आखाड्यात धुरळा उडाला आहे.
Last Updated: Jan 10, 2026, 18:40 ISTधीरज मोरे ब्राझीलमध्ये आपल्या गाडीवर शिवसेनेचा वाघ लावून फिरतोय. तो म्हणतो शिवसेनेनं नडायला शिकवलं, भिडायला शिकवलं...या कट्टर शिवसैनिकासाठी काय आहे शिवसेना? बघूयात...
Last Updated: Jan 10, 2026, 18:17 ISTकांजूरमार्ग पूर्वेमध्ये एका परिसरात 21 मजली इमारतीमध्ये आग लागली आहे.या इमारतीमध्ये शासनाची अंगणवाडीही आहे.ही आग इलेक्ट्रीक मीटर केबीनमध्ये लागल्याची माहिती समजते आहे. पुर्ण इमारत नागरिकांनी रिकामी केली आहे.
Last Updated: Jan 10, 2026, 18:01 IST