
पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिकाचा निकाल लागला आणि थेरगाव मध्ये एक कार पेटवली आहे. ही गाडी शिंदे शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराच्या चुलत भावाची आहे. त्यानंतर त्यांनी ही गाडी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ही कार पेटवली आहे. हा सीसीटीव्ही व्हायरल झाला.
Last Updated: Jan 17, 2026, 15:10 ISTठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, "बहुतेक सर्व नगरसेवक शिंदेंकडे गेले नसते. आमच्याकडून फोडले गेलेले सगळे पराभूत झाले. एकनाथ शिंदे जैचंद झाला नसता तर भाजपच्या १०० पिढ्या उतरल्या असत्या तरी भाजपचा म्हणजे महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा महापौर बसला नसता आणि झेंडा फडकला नसता."
Last Updated: Jan 17, 2026, 14:52 ISTछत्रपती संभाजीनगर : शुद्ध, भेसळमुक्त आणि आरोग्यदायी तेलाला सध्या बाजारात मोठी मागणी वाढताना दिसत आहे. शेंगदाणे, करडी, जवस, करडई, सोयाबीन यांसारख्या विविध तेलांची घरगुती पद्धतीने निर्मिती करण्याकडे अनेक नागरिकांचा कल वाढला आहे. पारंपरिक तसेच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित तेलघाणा यंत्र या कामासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. कमी खर्चात आणि कमी जागेत हे यंत्र वापरून दर्जेदार तेल काढता येते. ग्रामीण तसेच शहरी भागात तेलघाणा व्यवसाय हा उत्पन्नाचा चांगला स्रोत ठरत आहे. तेलघाणा यंत्राचा वापर कसा करायचा, त्याची क्षमता किती आहे आणि व्यवसाय सुरू करताना कोणत्या बाबींची काळजी घ्यावी, याबद्दल सविस्तर माहिती तेलघाणा यंत्र विक्रेते योगेश सुनेवाड यांच्याकडून जाणून घेऊ.
Last Updated: Jan 17, 2026, 14:24 ISTमुंबई : दादर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांचा विश्वास जपणारे राम पाटील काका हे नाव आज सगळ्यांना माहीतच आहे. मागील सुमारे 35 ते 40 वर्षांपासून ते दादरमध्ये कपड्यांचा स्टॉल लावत असून मेहनत, प्रामाणिकपणा आणि दर्जेदार माल यामुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. बदलत्या काळानुसार ग्राहकांच्या गरजा ओळखत त्यांनी आपल्या स्टॉलवर नेहमीच दर्जा आणि परवडणारे दर यांचा समतोल राखला आहे.
Last Updated: Jan 17, 2026, 13:33 ISTईव्हीएम मशीन स्ट्राँग रुम मध्ये घेऊन जाईपर्यंत ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी ईव्हीएम मशीन नेणाऱ्या गाडीचा पाठलाग केला. कोणत्याही प्रकारे घोळ होऊ नये म्हणून ते गाडीच्या पाठीमागून सुरक्षेसाठी गेले.
Last Updated: Jan 15, 2026, 21:30 IST