Income Tax Bharti 2026: खेळाडूंसाठी आनंदाची बातमी! इन्कम टॅक्समध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पगार 81000 रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
मुंबई आयकर विभागामध्ये नोकरी करू पाहणाऱ्या तरूणांसाठी आनंदाची बातमी म्हणता येईल. मुंबई आयकर विभागामध्ये नोकरीची संधी चालून आली आहे. स्टेनोग्राफर, टॅक्स असिस्टंट आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी नोकरभरती केली जाणार आहे.
advertisement
1/6

मुंबई आयकर विभागामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. स्टेनोग्राफर, टॅक्स असिस्टंट आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी नोकरभरती केली जाणार आहे. एकूण 97 जागांसाठी नोकरभरती होणार इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करु शकणार आहेत. भरतीसाठी पात्रता किती? शेवटची तारीख किती? जाणून घेऊया...
advertisement
2/6
मुंबई आयकर विभागामध्ये राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू, आंतरविद्यालय स्पर्धेमध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू, अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळ, खेळांमध्ये भाग घेणारे खेळाडू आणि राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडूंना केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या संस्थेमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे.
advertisement
3/6
स्टेनोग्राफर ग्रेड- II पदासाठी 12 जागा, टॅक्स असिस्टंट पदासाठी 47 जागा आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी 38 जागांवर नोकरभरती होणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2026 आहे. नोकरभरती होत असलेल्या तीनही पदांची पात्रता ते वेगवेगळ्या खेळातले खेळाडू हवे आहे, अशी आहे. खेळाच्या पात्रतेसोबतच अर्जदार 12वी उत्तीर्णही असावा.
advertisement
4/6
ऑनलाईन अर्ज प्रक्रियेची शेवटची तारीख आणि पेमेंट करण्याची शेवटची तारीख एकच असणार आहे. स्टेनोग्राफर ग्रेड- 2 आणि टॅक्स असिस्टंट पदासाठी 25,500 ते 81,100 पर्यंत पगार, मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी 18,000 ते 56,900 पर्यंत पगार असणार आहे. मुंबई आयकर विभागात नवीन नियुक्त होणाऱ्या नोकरदारांना 7 व्या वेतन आयोगाप्रमाणे पगार दिला जाणार आहे.
advertisement
5/6
स्टेनोग्राफर ग्रेड- 2 पदासाठी 18 ते 27 वर्षे वयाची अट, टॅक्स असिस्टंट पदासाठी 18 ते 27 वर्षे वयाची अट आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी 18 ते 25 वर्षे वयाची अट असणार आहे. अनुसूचित जाती- जमाती वर्गातील उमेदवारांना वयासाठी 10 वर्षांची सूट असणार आहे. फी 200 रूपये इतके असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी एकदा जाहिरात पाहूनच अर्ज भरू शकणार आहेत.
advertisement
6/6
जाहिरातीच्या PDF ची ऑनलाईन लिंक- <span style="color: #3366ff;"></span>ऑनलाईन अर्ज करण्याची अधिकृत लिंक- <span style="color: #3366ff;"></span>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Income Tax Bharti 2026: खेळाडूंसाठी आनंदाची बातमी! इन्कम टॅक्समध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पगार 81000 रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?