TRENDING:

'मी युपीवाला नाही, मराठी आहे', अनेक वर्ष चर्चा, हिंदी मालिकेच्या लोकप्रिय अभिनेत्यानं अखेर मौन सोडलं

Last Updated:
अनेक वर्षा हिंदी मालिकांमध्ये काम करणारा प्रसिद्ध अभिनेता त्यांच्या आयडेंटीविषयी पहिल्यांदाच बोलला.अनेक वर्ष त्याला तो यूपीचा आहे असं समज होता.
advertisement
1/9
'मी युपीवाला नाही,मराठी आहे', अनेक वर्ष चर्चा; फेमस अभिनेत्यानं अखेर मौन सोडलं
CID हा टेलिव्हिजनच्या जगातला सर्वात लोकप्रिय शो होता. या शोचा दुसरा सीझन देखील अनेक वर्षांनी समोर आला. पण या सीझनमध्ये एक मोठा ट्विस्ट होता. काही एपिसोडनंतर शोमधील सगळ्यात लोकप्रिय पात्र म्हणजे अभिनेता शिवाजी साटम यांचं एसीपी प्रद्युमन.
advertisement
2/9
शोमधून काही एपिसोडनंतर एसीपी प्रद्युमनला रिप्लेस करण्यात आलं. अभिनेते शिवाजी साटम यांच्या ऐवजी प्रसिद्ध अभिनेता पार्थ समथान याने ही भूमिका साकारली. ACP आयुष्मान म्हणून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला.
advertisement
3/9
ACP प्रद्युमनची भूमिक साकारण्याआधी पार्थ प्रचंड घाबरला होत. या शोमधून तो 5 वर्षांनी कमबॅक करणार होत. त्याने सुरुवातीला या शोला नकार दिला होत. पण निर्मात्यांनी त्याची समजूत काढल्यानंतर तो हा शो करण्यासाठी तयार झाल.
advertisement
4/9
अभिनेता पार्थ समथान याने पहिल्यांदाच त्याच्याविषयी एक महत्त्वाची माहिती दिली. पार्थला अनेक जण यूपीवाला समजत होतं. पण पार्थ हा मराठी मुलगा आहे. त्याने नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना तो मराठी असल्याचं सांगितलं.
advertisement
5/9
पार्थ म्हणाला, "मी मराठी खूप चांगलं बोलतो. लोकांना माहिती नाही की मराठी आहे. मी पुण्याचा आहे. खूप लोकांना मी नॉर्थ इंडियन आहे असं वाटतं. मी मराठी आहे."
advertisement
6/9
"लोकांना हे माहिती असणं गरजेचं आहे कारण लोकांना वाटतं की हा पण तिकडचाच आहे. मी तुमचाच आहे, मराठी माणूस आहे."
advertisement
7/9
पार्थचं खरं नाव पार्थ लघाटे आहे. त्याचा जन्म 11 मार्च 1991 साली पुण्यात झाला. 2014 साली आलेल्या 'कैसी ये यारियां' या मालिकेतून लोकप्रिय झाला.
advertisement
8/9
अभिनयाच्या सुरुवातील त्याने 'सावधान इंडिया', 'वेब्ड', 'ये है आशिकी' आणि 'प्यार तूने क्य किया' सारख्या मालिकांमध्ये काम केलं. 'गुमराह: एंड ऑफ इनोसेन्स', 'बेस्ट फ्रेंड्स फॉरएवर' सारख्या फेमस सीरिजमध्येही काम केलं हे.
advertisement
9/9
पार्थची सोशल मीडियावर देखील कमालीची फॅन फॉलोविंग आहे. इन्स्टाग्रामवर त्याला 3.9 मिलियनहून अधिक लोक फॉलो करतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'मी युपीवाला नाही, मराठी आहे', अनेक वर्ष चर्चा, हिंदी मालिकेच्या लोकप्रिय अभिनेत्यानं अखेर मौन सोडलं
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल