TRENDING:

Success Story : 5 वर्षांपासून निवडला मार्ग, शेतकरी करतोय कारल्याची शेती, आता 15 लाखांचं उत्पन्न, Video

Last Updated:

शेतकरी आप्पासाहेब आहेर हे गेल्या 5 वर्षांपासून कारल्याची शेती करत आहेत. पहिल्या वेळेस तीन एकर आणि दुसऱ्या वेळेस दोन असे एकूण पाच एकर क्षेत्रामध्ये त्यांनी कारले लागवड केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : तालुक्यातील टोणगाव येथील शेतकरी आप्पासाहेब आहेर हे गेल्या 5 वर्षांपासून कारल्याची शेती करत आहेत. पहिल्या वेळेस तीन एकर आणि दुसऱ्या वेळेस दोन असे एकूण पाच एकर क्षेत्रामध्ये त्यांनी कारले लागवड केली आहे. यातील तीन एकर टोमॅटो स्ट्रक्चरवर लागवड केला आहे. याला दोन ते सव्वा दोन महिने झाले. एकूण या शेतीसाठी अडीच ते तीन लाख रुपये खर्च आला आहे. तसेच गतवर्षी आहेर यांना 15 लाखांचे उत्पन्न या माध्यमातून मिळाले होते. यंदा देखील त्यांना या कारले पिकातून 16 लाखांचे उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आप्पासाहेब आहेर यांनी लोकल 18 सोबत बोलताना व्यक्त केली आहे.
advertisement

कारल्याची सद्यस्थितीला दुसरी काढणी सुरू आहे. थंडीमुळे कारले काढण्यासाठी थोडा उशीर होत आहे. जूनमध्ये जी कारल्याची काढणी केली जाते ती जलद गतीने होते. कारल्याची शेती गेल्या पाच ते सहा वर्षांपासून करतो मात्र ही शेती बाजाराचा अभ्यास करून सीजनमध्ये करावी लागते. संपूर्ण उत्पन्न हे बाजारभावावर अवलंबून असते सध्याच्या बाजारभावानुसार 15 ते 16 लाख रुपये उत्पन्न यामधून मिळेल. यामधून बियाण्यांपासून ते काढणीपर्यंत सर्व खर्च जवळपास अडीच ते तीन लाखांपर्यंत वजा करावे लागेल. बाकीची उर्वरित रक्कम बारा लाख रुपये ही निव्वळ नफा म्हणावी लागेल, असे देखील आहेर यांनी म्हटले आहे.

advertisement

Success Story : पारंपरिक शेतीला दिला फाटा, केली खरबूज लागवड, शेतकऱ्याची लाखांत कमाई, Video

सध्याच्या काळात सर्वच शेतकऱ्यांचे खर्च वाढलेले आहेत आणि यामध्ये पारंपरिक पीक घ्यायचे म्हटल्यास हे खर्च भागवणे कठीण बनले आहे. कारले, पालेभाज्या हे पीक जलद गतीने फायदा करून जातात आणि यामध्ये चांगले उत्पन्न देखील मिळते.

कारल्याची शेती कशी करावी?

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
5 वर्षांपासून निवडला मार्ग, शेतकरी करतोय कारल्याची शेती, आता 15 लाखांचं उत्पन्न
सर्व पहा

नवीन शेतकऱ्यांना कारल्याची लागवड करायची झाल्यास, त्यांनी नक्कीच करावी याबरोबरच इतर पालेभाज्या पिकवून ज्या जमिनीत अवघड होते त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी कारले हा पर्याय उत्तम आहे. तसेच शेतकऱ्यांनी फेरपालट करूनच कारल्याची निवड करावी. जे भाजीपाला क्षेत्रात नवीन आहेत त्यांच्यासाठी कारले हे पीक चांगलं उत्पन्न देणारे आहे. कारल्याची लागवड सात बाय दोन वर करण्यात आली आहे. कोणत्याही वेलवर्गीय पिकामध्ये व्हेंटिलेशन महत्त्वाचे आहे. व्हेंटिलेशन असल्यामुळे कळी पिवळी पडणे, रोगाचा प्रादुर्भाव होणे या बाबी होत नाहीत. या पिकाला मोठे अंतर घेणे महत्त्वाचे आहे.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
Success Story : 5 वर्षांपासून निवडला मार्ग, शेतकरी करतोय कारल्याची शेती, आता 15 लाखांचं उत्पन्न, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल