महायुती सरकारच्या मंत्र्याने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. लोकांना कर्जमाफीचा नाद लागला असल्याचं बेताल वक्तव्य महायुतीच्या मंत्र्याने केला आहे. या वक्तव्यावरून संताप केला जात आहे.जळगावमधील चोपडामध्ये बोलताना राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे. चोपडा पीपल्स को ऑप बँक चे घोडगाव येथे शाखेच्या उद्घाटन निमित्त सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आले असते त्यावेळेस ते बोलत होते