साहेबराव कोकणे, प्रतिनिधी नगर: अहिल्यानगर - पाथर्डी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग कल्याण–विशाखापट्टणम, राज्य महामार्ग बारामती–छत्रपती संभाजीनगर, राज्य मार्ग पाथर्डी–बीड तसेच बीड ते मोहटा देवस्थान या महत्त्वाच्या रस्त्यांवरील पुलांवरून पाणी वाहत असून, प्रशासनाने सर्व वाहतूक बंद केली आहे. पर्यायी मार्गांही बंद झाले आहे.