कृष्णा आंधळेला नाशिकच्या गंगापूर रोडवर पाहिल्याचा स्थानिकांचा दावा केला, त्यानंतर दुचाकीवर आंधळे आणि त्याचा साथीदार दिसल्याचा दावा केला. पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू झाला आहे. पोलीस अलर्ट मोडवर आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य फरार आरोपी असलेल्या कृष्णा आंधळेला नाशिकमध्ये बघितल्याचा दावा स्थानिकांनी केला. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील दत्त मंदिर चौकात कृष्णा आंधळेला बघितल्याचा दावा तिथल्या स्थानिकांनी केला आहे. यानंतर आता तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांकडून याप्रकरणी शोधकार्य सुरू आहे. या परिसरातील सीसीटीव्ही तपास करण्यात येत आहे. एका दुचाकीवर कृष्णा आंधळे आणि आणखी एक साथीदार याठिकाणी सकाळी साडेनऊ वाजता दिसल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दबा धरून बसलाय की काय अशा चर्चांनी जोर धरलाय. त्यामुळे पोलिसांकडून आता अधिक तपास सुरू आहे.