प्रतिनिधी प्रितम पंडित: बार्शी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे चांदणी नदीला महापूर आला असून काटेगाव ते चारे रस्त्यावरील पूल वाहून गेला आहे. या घटनेमुळे मसोबाचीवाडी, बांगरवाडी, चारे, पाथरी या सह पूर्व भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दररोज शेकडो शेतकरी या पुलावरून आपल्या शेतात ये-जा करीत होते. पूल वाहून गेल्याने शेतकऱ्यांना शेतातील कामकाजासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच शाळकरी मुले, रुग्ण व नागरिकांच्या दैनंदिन हालचाली ठप्प झाल्या आहेत.स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाला तातडीने पर्यायी व्यवस्था करून देण्याची मागणी केली आहे.