
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांमध्ये भारतीय जनता पक्षाने आपले मत मांडल्याने आता प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे. अजित पवार राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महायुतीच्या सरकारमधून बाहेर पडणार होते का? असा सवाल मुख्यमंत्री फडणवीस यांनी विचारला. त्यांच्या याच प्रश्नाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी उत्तर दिले.शशिकांत शिंदे म्हणाले,अजित पवार यांच्या अस्थींची शपथ घेऊन सांगतो, माझे त्यांच्याशी भावनिक नाते आहे. अजित पवार यांनी आमच्याशी विलिनीकरणाबाबत चर्चा केली होती.