
राज्यात निवडणुकीत अर्ज माघारीवरुन सगळीकडे राडे पाहायला मिळत आहेत. अशा अनेक घटना घडत आहेत. अनेक ठिकाणी वाद, बाचाबाची चालली आहे.काही ठिकाणी फ्रीस्टाइल हाणामारी झाली, तर काही ठिकाणी हत्याही महाराष्ट्राला पाहायला मिळाली.
Last Updated: Jan 02, 2026, 20:14 ISTहिंगोलीमध्ये सेनगाव शहरामध्ये माजी नगराध्यक्ष संदिप बहिरे यांच्या घरावर दगडफेकीची घटना घडली आहे. दोन आरोपींनी घरावर दगडफेक केल्याचे चित्र दिसत आहे. या आरोपींनी दगड, विटा घरावर फेकल्या.त्यामुळे त्या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे.
Last Updated: Jan 02, 2026, 21:39 ISTअज्ञातांनी पिंपरीतील काळखडक परिसरात 8 ते 10 वाहनांची तोडफोड केली आहे. तसेच नागरिकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी हे प्रयत्न अज्ञातांचे आहे असे समजते. गुंडांचा हैदोस परिसरात दिसून येत आहे.
Last Updated: Jan 02, 2026, 21:23 ISTराज्यात महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना, प्रत्यक्ष मतदानापूर्वीच काही जागांवरील निकालाचे चित्र स्पष्ट दिसू लागले आहे. भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या युतीचे कल्याण-डोंबिवली 21 विजयी झाले आहेत. बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये भाजपचे सर्वाधिक उमेदवार असून त्यापाठोपाठ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत.
Last Updated: Jan 02, 2026, 20:47 ISTमहाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणुकीमुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी भाजप-शिवसेनेने महाविकासआघाडीला जोरदार धक्का दिला आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजप-शिवेसनेचे 21 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत, यात भाजपचे 15 आणि शिवसेनेचे 6 उमेदवार आहेत.
Last Updated: Jan 02, 2026, 20:25 IST