Pune Swargate Rape Case Datta Gade: दोन दिवस ऊसाच्या शेतात पाणी न मिळाल्यामुळे दत्ता गाडे रात्री आपल्या नातेवाईकांच्या घरी पाणी पिण्यासाठी जात होता. पोलिसांना याची खबर मिळाली. रात्रीची वेळ साधून पोलिसांनी ड्रोन आणि श्वान पथकाच्या मदतीने शेतभर शोधमोहीम सुरू केली. श्वान पथकाच्या भुंकण्याचा आवाज रात्रीच्या शांततेत घुमला आणि पोलिसांचा ससेमिरा गाडेच्या मागावर होता. शेवटी रात्री एक वाजता, तो कॅनॉलजवळ झोपलेला असताना पोलिसांच्या नजरेस पडला. पोलिसांनी दबक्या पावलांनी त्याच्या दिशेने वाट काढली. काही क्षणातच त्याला ताब्यात घेतलं. 70 तासांच्या शोध मोहिमेला पोलिसांना अखेर यश मिळालं आणि आरोपीच्या मुसक्या आवळल्या.