कात्रज बोगद्याजवळ नवले ब्रिजकडे येताना दरी पुलाजवळ जांभुळवाडीत भीषण अपघात झाला आहे. लोखंडी पाईप भरलेल्या ट्रकने एका बसला मागुन जोरदार धडक दिली आहे. त्यात ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे. तर बसमधील ४ ते ५ प्रवासी जखमी झाले.