भिवंडी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास येथील एका गोदामाला भीषण आग लागली. आगीची तीव्रता इतकी होती की, या गोदाम संकुलातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भिवंडीसह कल्याण आणि उल्हासनगर पालिकांच्या अग्निशमन दलाच्या 5 गाड्यांनी अथक प्रयत्न केले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, आगीवर नियंत्रण मिळवताना एका अग्निशमन कर्मचाऱ्यारी जखमी झाला आहे.