मुंबई – बोरीवली येथील कल्पना चावला चौकात सकाळी अचानक रस्त्याच्या मध्यभागी मोठं भगदाड कोसळलं. या घटनेमुळे परिसरात अचानक गोंधळ उडाला, वाहतूक अडथळ्यात आली आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटना लक्षात येताच पोलिसांनी त्वरित धाव घेत बॅरीकेटिंग केले आणि प्रवाश्यांना पर्यायी मार्गाने प्रवास करण्यास सांगितले. मात्र, या अचानक घटनेमुळे रस्त्याच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे