TRENDING:

कमी खर्चात स्टायलिश लुक ; घरच्या साडीतून बनवा आकर्षक घागरा-चोली

Last Updated : मुंबई
मुंबई: नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. मार्केटमध्ये चनिया चोली आणि घागरा चोलीचे डिझाईन्स रंगीबेरंगी पॅटर्नमध्ये उपलब्ध झाले आहेत. मात्र, यांची किंमत साधारण दीड हजार रुपयांपासून सुरू होत असल्याने अनेकांना हा खर्च परवडत नाही. त्यामुळे यंदा नवरात्रीत कमी खर्चात स्टायलिश लुक करायचा असेल, तर घरातल्या साडीपासून घागरा चोली तयार करण्याचा ट्रेंड महिलांमध्ये जोर पकडतो आहे. घरातल्या कॉटन साडी, बांधणी प्रिंट किंवा हलक्या वजनाच्या साड्या वापरून सहजपणे घागरा शिवता येतो. त्याच साडीतून दुपट्टा आणि छोलीदेखील बनवता येते. विशेष म्हणजे हे डिझाईन केवळ नवरात्रीपुरतेच नव्हे तर लग्नसमारंभ किंवा खास प्रसंगासाठीही वापरता येते.
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
कमी खर्चात स्टायलिश लुक ; घरच्या साडीतून बनवा आकर्षक घागरा-चोली
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल