मुंबई: चातुर्मासात येणाऱ्या अश्विन महिन्यातील शुद्ध पक्षात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. प्रतिपदा ते नवमी अशा नऊ दिवसांच्या कालखंडात आदिमायेच्या विविध नऊ स्वरुपांचे पूजन, नामस्मरण, उपासना, जप, भजन, कीर्तन केले जाते. आपापल्या पद्धतीप्रमाणे विशेष व्रतपूजन केले जाते. सोमवार, 22 सप्टेंबर 2025 पासून नवरात्र सुरू झालं ahem 23 सप्टेंबर मंगळवारी दुसरी माळ असून, दुर्गा देवीचे द्वितीय स्वरुप ब्रह्मचारिणी देवीला समर्पित आहे. ब्रह्मचारिणी देवीची महती, मंत्र, महत्त्व यांविषयी आदित्य जोशी गुरुजी यांनी लोकल 18 सोबत संवाद साधताना सांगितलं आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया