TRENDING:

Ear Care Tips : थंडीच्या काळात अशी घ्या कानाची काळजी! अन्यथा कानाचे होईल मोठे नुकसान..

मुंबई : थंडीचा जोर वाढू लागला की आपल्या शरीरात अनेक बदल होतात. या काळात सर्दी-खोकल्याचा त्रास वाढतो आणि त्याचा थेट परिणाम आपल्या कानांवर देखील होतो. त्यामुळे कान दुखणे, कान खाजवणे अशा समस्या उद्भवतात. या त्रासाचे कारण केवळ सर्दी नसून, थंडीच्या काळात आपल्या काही चुकीच्या सवयींमुळेही हे होऊ शकते. या विषयावर नाशिक येथील ई.एन.टी. तज्ञ डॉ. गौरव रॉय यांनी मार्गदर्शन केले आहे.

Last Updated: November 20, 2025, 20:26 IST
Advertisement

Skin Care Tips : तुमची त्वचा हिवाळ्यात कोरडी पडतेय? डेली नाईट स्किन केअर रूटीन असं करा, राहील तजेलदार

अमरावती : वातावरणात गारवा वाढलाय. त्यामुळे आता त्वचा कोरडी पडण्यास सुरुवात झाली आहे. त्वचा कोरडी झाली की, अनेक समस्या निर्माण होतात. त्वचेला खाज येते, बारीक पुरळ येतात. म्हणून हिवाळ्यात स्किन केअर रूटीन ठरलेले असणे महत्त्वाचे आहे. हिवाळ्यात डेली नाईट स्किन केअर रूटीन कसं असायला हवं? याबाबत माहिती त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी दिली आहे.

Last Updated: November 20, 2025, 19:30 IST

Success Story : फक्त 14 गुंठ्यात केली लागवड, 45 दिवसात मिळणार लाखात उत्पन्न, शेतकऱ्यानं करून दाखवलं!

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील येवती गावात राहणाऱ्या राजाराम बजरंग कदम यांनी 14 गुंठ्यात दोडक्याची लागवड केली आहे. सध्या दोडक्याला भाव चांगला मिळत असून दोडका विक्रीतून राजाराम कदम यांना 45 दिवसांत 1 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न शेतकरी राजाराम कदम यांना मिळणार आहे.

Last Updated: November 20, 2025, 18:44 IST
Advertisement

Agriculture News : शेतीला मिळेल नवसंजीवनी, माती सुधारण्यासाठी करा हे 3 नैसर्गिक उपाय, कृषी तज्ज्ञांचा सल्ला

बीड

बीड : आजच्या घडीला जमिनीची सुपीकता कमी होणे हे शेतीसमोरील सर्वात मोठ्या प्रश्नांपैकी एक मानले जात आहे. सतत रासायनिक खतांचा वापर, पाण्याची कमतरता आणि जास्त मशागत यामुळे मातीची रचना बिघडत आहे. विज्ञान सांगते की मातीला जिवंत ठेवण्यासाठी त्यात सूक्ष्मजीव असणे अत्यावश्यक आहे आणि हे सूक्ष्मजीव वाढवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नैसर्गिक पद्धत. अभ्यासानुसार नैसर्गिक उपायांद्वारे माती सुधारल्यास उत्पादनात 20-25 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. त्यामुळेच शाश्वत शेतीसाठी माती सुधारण्याचे उपाय हे आजच्या काळाची गरज ठरत आहेत. याबद्दलच कृषी अभ्यासक महादेव बिक्कड यांनी माहिती दिली आहे

Last Updated: November 20, 2025, 18:10 IST

जखम लवकर बरी करायला मदत करते 'ही' वनस्पती; पाहा काय आहेत बहुगुणी फायदे

वर्धा: कंबरमोडी ही एक सूर्यफूल कुळातली लहान वनस्पती आहे. ही मुरुमाड प्रदेशात जास्त उगवते. भारतात शेतांमध्ये आणि पडक्या जमिनीवर उगवणारे हे एक तण आहे. पायाला ठेच लागून, वा कोणत्याही प्रकारे जखम झाली असता, या वनस्पतीच्या पानाचा रस काढून त्यावर टाकला असता जखम लवकर बरी होते. अशाप्रकारे कंबरमोडीचे कोणते कोणते फायदे आहेत आणि कंबरमोडीचा उपयोग आपल्या आरोग्यासाठी आपण कशा प्रकारे करू शकतो? यासंदर्भात वर्ध्यातील आयुर्वेदिक डॉक्टर नितीन मेशकर यांनी माहिती दिली आहे

Last Updated: November 20, 2025, 17:31 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
Ear Care Tips : थंडीच्या काळात अशी घ्या कानाची काळजी! अन्यथा कानाचे होईल मोठे नुकसान..
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल