
मुंबई : महागाईच्या काळात महिलांना परवडणाऱ्या किमतीत ट्रेंडी आणि आरामदायक कपडे मिळणे कठीण झाले आहे. मात्र, दादरमधील एका स्टॉलमुळे हे चित्र बदलताना दिसत आहे. दादर वेस्ट परिसरात अवघ्या 350 रुपयांत आकर्षक कॉर्ड सेट ड्रेस उपलब्ध होत असून, याची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे हे कॉर्ड सेट एम ते थेट 5 एक्सएल (M to 5XL) साईजपर्यंत मिळत आहेत, जे प्लस साईज महिलांसाठी मोठे आकर्षण ठरत आहे.