श्रीनगर - जम्मू-काश्मिरमध्ये सीमारेषेवर अलीकडेच पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं. भारतीय सैन्याने त्याला जोरदार असं प्रत्युत्तर दिलं. भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. भारतीय सैन्याने केलेल्या या हल्ल्यात १० ते १२ पाकिस्तानी जवान ठार झाले तर १५ ते २० दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे.