दिल्ली : राष्ट्रीय अडचणींना सामोरं जाण्याऐवजी राजकारणासाठी त्याला लपवून ठेवण्यात आलं होतं. पण आम्ही हे आता याला थारा देणार नाही. 21 व्या शतकामध्ये जुन्हा राजकारणाचा भार टाकणार नाही. भारताच्या राजकारणामध्ये लांगूलचालन हे मोठं आव्हान ठरलं आहे. लांगूलचालनाचं राजकारण नवं नाही हे बीज भारताच्या स्वातंत्र्याच्या आधीपासून रोवलं गेलं, या लांगूलचालनाची वाढ करण्यास काँग्रेसने खतपाणी दिलं,असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली.