
पुणे : आर्थिक ताण, कौटुंबिक कलह, सततची स्पर्धा आणि मानसिक दडपणाचा वाढता बोजा… या सर्वांचा परिणाम पुरुषांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर स्वरूपात होत असल्याचे चिंताजनक चित्र पुण्यात समोर आले आहे. गेल्या चार वर्षांत तब्बल 558 पुरुषांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकार समोर आली आहे. एकूण 710 स्त्री-पुरुषांनी विविध कारणांमुळे जीवनयात्रा संपवली असून त्यापैकी 78 टक्के केसेस पुरुषांच्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते विहार दुर्वे यांनी मागवलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाली आहे.