
पुणे: आपण रोजच्या वापरात 5-10 रुपयांचे पेन वापरत असतो. फारतर काही खास पेन म्हणून 500 रुपयांपर्यंतचे पेन देखील खरेदी केले जातात. पण एखाद्या पेनची किंमत 10 लाखांवर आहे, असं कुणी सांगितलं तर आपला विश्वास बसणार नाही. असेच अगदी 300 रुपयांपासून ते 10 लाख रुपयांपर्यंतचे पेन पुण्यात पाहता येणार आहेत. पुण्यातील म्हात्रे पुलाजवळ, डी.पी. रस्त्यावरील सिद्धी बँक्वेट्स येथे खास पेनचं प्रदर्शन भरलंय. त्यामुळे पेन प्रेमींना इथं दुर्मीळ आणि युनिक पेन पाहता येणार आहेत.
Last Updated: Jan 12, 2026, 15:11 ISTदेवेंद्र फडणवासांनी पुण्याच्या मुलाखतीमध्ये अजित दादांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, "निवडून येता येत नाही तेव्हा काहीही जाहिरनामे काढतो, घोषणा करतात. पुण्यात घोषणा करणार होतो.पुण्यातील महिलांना विमान प्रवास फ्री करणार होतो. अनाउन्स करायला आपल्या बापाचं काय जातंय.."
Last Updated: Jan 12, 2026, 18:14 ISTभाजपने नाशिकच्या मुकेश शहाणेंची भाजप मधुन हकालपट्टी केली आहे. त्यांना पक्षातून काढल्यावर ते म्हणाले, "माझं काय चुकलं. माझ्यावर कुठले गुन्हेही नाहीत. मी प्रत्येक आंदोलनात सहभागी झालो. मी एकनिष्ठेने राहिलो हिच माझी चुक का, निष्ठावंत कार्यकर्त्याचा बळी दिलाय तुम्ही. हेच मला फळ दिलात काय."
Last Updated: Jan 12, 2026, 17:56 ISTकालच शिवतीर्थावर ठाकरे बंधूंची सभा झाली. त्यात मराठी भाषेचा उल्लेख झालाच. पण आज तीन हात नाका येथे इंग्रजी बॅनर लावल्याने ठाकरे बंधू ट्रोल झाले आहेत. तेव्हा मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले,"एकच बॅनर इंग्रजीमध्ये लावला आहे. बाकीचे ९९ टक्के बॅनर हे माराठीतच लावले आहेत. तो एक बॅनर परिभाषिकांसाठी लावला आहे." त्यावरुन मनसे आणि ठाकरे गट विरोधकांकडून ट्रोल झाला आहे.
Last Updated: Jan 12, 2026, 17:38 ISTपत्रकारांशी बोलताना आरपीआयचे मंत्री रामदास आठवले म्हणाले, "मुंबई पालिकेत राज ठाकरेंना फायदा होणार नाही. कारण ६० टक्के लोकं परप्रांतिय आणि ४० टक्के मराठी वोटर आहेत. राज ठाकरेंचं पानीपत होणार आहे. त्यामुळे आम्ही बीजेपी, शिवसेना महायुती सोबत येऊन लढत आहोत. त्यामुळे पनवेल आणि मुंबई महानगरपालिका आम्ही जिंकणार आहोत."
Last Updated: Jan 12, 2026, 16:57 ISTबीड : शेतीत कीड आणि रोग नियंत्रणासाठी फवारणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. मात्र फवारणीची योग्य वेळ चुकल्यास शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागू शकते. कृषी तज्ज्ञांच्या मते, पिकांच्या वाढीच्या ठराविक अवस्थेत आणि अनुकूल हवामानात फवारणी करणे आवश्यक असते. वेळेवर उपाय न केल्यास किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो आणि त्याचा थेट फटका उत्पादनावर बसतो. याबद्दलच कृषी अभ्यासक महादेव बिक्कड यांनी माहिती दिली आहे
Last Updated: Jan 12, 2026, 16:45 IST