पुण्यातील शनीपार मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात गणपती बाप्पासाठी आगळावेगळा देखावा उभारला आहे. श्रीकृष्णाची जलमय द्वारका या संकल्पनेवर आधारित हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. लाईट्स, सजावट आणि पाण्याचा अप्रतिम संगम पाहून भाविक मंत्रमुग्ध झाले आहेत.